राज्यस्तरीय एकपात्री स्पर्धेत आर्या समीर वंडकर प्रथम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

मराठी रंगभूमी रत्नागिरी आयोजित राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेत रत्नागिरीच्या आर्या वंडकर हिने प्रथम क्रमांक पटकावला.

या स्पर्धेत श्वेता सावंत ही द्वितीय आणि देवव्रत पवार हा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. मनिष साळवी याला पहिले लक्षवेधी पारितोषिक तर न्यासा पेडणेकर हिला दुसरे लक्षवेधी पारितोषिक मिळाले. याचबरोबर शरयू माळी, स्मितल चव्हाण आणि सिद्धेश शिंदे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देउन सन्मानित करण्यात आले.स्पर्धेत बीड, सोलापूर अहमदनगर येथील स्पर्धेकांनी सहभाग नोंदवला. अतिशय चुरशीची ठरलेल्या या स्पर्धेच्या निकालाची जबाबदारी रत्नागिरीतील ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत पाटील आणि अनिल दांडेकर यांनी सांभाळली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशांत जाधव, संतोष गार्डी आणि गणेश राऊत यांनी केले.पारितोषिक वितरण समारंभाला संस्थेचे उपाध्यक्ष प्रविण धुमक व खजिनदार कौस्तुभ केळकर उपस्थित होते. संस्थेतले अध्यक्ष अजित पाटील यांनी मराठी रंगभूमी, रत्नागिरीच्या वतीने सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले.