आर्यन खानच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाऊंट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता शाहरूख खानचा मुलगा व ड्रग्ज पार्टीतील आरोपी आर्यन खान याच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाऊंट असल्याची माहिती समोर आली आहे. या अकाऊंटवर आर्यन खानचा पह्टो दिसत असला तरी ते अकाऊंट त्याचे नाही. तसेच या अकाऊंटवरून पोस्ट होणाऱया मेसेजशी आर्यन खानचा कोणताही संबंध नाही. आर्यन खानच्या नावाने सुरु असलेल्या या फेसबुक अकाऊंटवरून गेल्या काही दिवसांपासून विविध पोस्ट केल्या जात आहेत. माझ्या वडिलांची म्हणजे शाहरूख खानची प्रतिमा मलिन करण्यासाठी मला ड्रग्ज पार्टी प्रकरणात गोवले आहे. याचा पर्दाफाश राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक करत आहेत. त्यामुळे त्यांना ट्विटरवर फॉलो करावे, तसेच मला पाठींबा द्यावा असे आवाहनही या अकाऊंटवरून केले होते. मात्र हे अकाऊंटच बनावट असल्याचे आता समोर आले आहे. दरम्यान आर्यन खान सोशल मिडियावर फारसा सक्रिय नसून त्याने 15 ऑगस्ट रोजी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यांनतर त्याने कोणतीच पोस्ट सोशल मिडियावर टाकलेली नाही.