आत्मा मलिककडून राज्यातील 775 हुशार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचे धडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात एकाच शाळेतील 64 विद्यार्थ्यांच्या निवडीमुळे देशात नंबर वन ठरलेल्या आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल यांनी आता दुसऱ्या टप्प्यातील राष्ट्रीय पातळीवर 2000 विद्यार्थ्यात महाराष्ट्राच्या पाचशे विद्यार्थ्यांचा समावेश होऊन राष्ट्रीय पातळीवरील टॅलेंट सर्च परीक्षेत महाराष्ट्र नंबर वन व्हावा यासाठी कंबर कसली आहे. पहिल्या टप्प्यातील 775 विद्यार्थ्यांना निवास भोजन व प्रशिक्षणासह दीड कोटीची भरघोस शिष्यवृत्ती देऊन प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. याचा राज्यातील सर्वच्या सर्व 775 विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट चे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेमधून केले आहे.

नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षा ही शासनाची देशपातळीवर घेतली जाणारी महत्वपूर्ण परिक्षा असून पहिला टप्पा राज्यस्तराचा व दुसरा टप्पा देशपातळीवरचा असतो. देशभरातून या परीक्षेसाठी सुमारे 12 ते 14 लाख विद्यार्थी पहिल्या टप्प्याची परिक्षा देतात त्यातून फक्त केवळ 2000 विद्यार्थी सन 2019-2020 साठी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणार आहे. दुसर्‍या स्तरावरील परिक्षेसाठी देशभरातून 8 हजार 387 विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

महाराष्ट्र राज्याला या वर्षी 774 विद्यार्थी पहिल्या स्तरावरील परीक्षेतून निवडण्याचे उद्दिष्टय दिले होते. नुकत्याच राज्यपरिक्षा परिषद पुणे यांनी निकाल जाहिर करुन 775 विद्यार्थ्यांना दुसर्‍यास्तरासाठी निवडले आहे. राज्यातील इ.10वी नॅशनल टॅलेंज सर्च परिक्षा देणार्‍याविद्यार्थ्यांची संख्या 7 हजार 500 इतकी आहे. राज्यातील 36 जिल्ह्यातील एकूण 33 जिल्ह्यातून विद्यार्थी निवडले गेले त्यात नागपूर विभागातील गडचिरोली व नाशिक विभागातील नंदुरबार व मुंबर्इ सबर्न विभागातून एकही विद्यार्थी निवडला गेला नाही. या परिक्षेसाठी संपूर्ण राज्यातून संभाजीनगर जिल्हा क्रमांक एक वर असून या जिल्ह्यातून 95 विद्यार्थी निवडले गेले तर नगर जिल्ह्याचा दुसरा क्रमांक असून या विभागात 84 विद्यार्थी निवडले गेले. त्यात ग्रामिण भागात कार्यरत असलेल्या आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचे 64 विद्यार्थी एकाच वेळी निवडले गेल्याने ही भूषणावह व गौरवास्पद बाब असल्याचे श्री सूर्यवंशी यांनी नमुद केले. महसुल विभागवार विचार केल्यांस संभाजीनगर विभागातून 283 विद्यार्थी निवडले गेल्याने हा विभाग क्रमांक एक वर आहे. नाशिक विभागातून 167 विद्यार्थी निवडले गेले. विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असणारे पुणे विभागातून केवळ 123 विद्यार्थी निवडून तो तिसर्‍या स्थानावर राहिला आहे.

775 विद्यार्थ्यांना कोपरगांव तालुक्यात कोकमठाण येथे 5 एप्रिल ते 5 जून असे दोन महिने प्रशिक्षण मोफत दिले जाणार असून त्या विद्यार्थ्यांची येथे निवास, भोजन,प्रशिक्षण आत्मामालिक इंटरनॅशनल स्कुलच्या कॅम्पस मध्ये केली जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी देशातील आकाश कोचींग इन्स्टीटयुटचे तज्ञ मार्गदर्शक तसेच एनडीए व फौंडेशन कोर्सचा आत्मा मालिक कन्सेप्ट पॅटर्न तयार करणारे पांडे ब्रदर्स यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे. चार दिवस चालणार्‍या या प्रशिक्षणाचे उदघाटन शुक्रवार दि 5 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता शिक्षणतज्ञांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी दि 4 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत शिर्डी कोपरगांव रोड कोकमठाण ता.कोपरगांव येथे आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कुल कॅम्पस मध्ये संपर्क करावा असेही आवाहन करण्यात आले.

आत्मा मलिक संकुलाला कडून पहिल्या 300 विद्यार्थ्यांना दीड कोटीची भरघोस शिष्यवृत्ती, नॅशनल टँलेंट सर्च या परिक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या पहिल्या 775 पैकीपहिल्या 200 विद्यार्थ्यांना 1 लाख 40 हजार तर पुढील 301 ते 400 या 100 विद्यार्थ्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये शिष्यवृत्ती काही अटी व शर्तींवर दिली जाणार असल्याचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी यावेळी जाहीर केले.