खुनाच्या प्रयत्नातील फरारी सराईत हल्लेखोराला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खुनाच्या प्रयत्नातील गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत हल्लेखोराला चंदननगर पोलिसांनी नागपाल रस्ता परिसरात बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे. हल्ला केल्यानंतर तो पसार झाला होता. मात्र, चंदननगर पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली. हुसेन युनोस शेख (19, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

चंदननगर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलिस कर्मचारी सचिन रणदिवे यांना खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी नागापाल रोड येथील मातोश्री सोसायटी समोर उभा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला. त्याच्यावर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न तर विमानतळ पोलिस ठाण्यात गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी उपायुक्त शशिकांत बोराटे, एसीपी किशोर जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अरविंद कुमरे, अमंलदार सुहास निगडे, सचिन रणदिवे, अविनाश संकपाळ, महेश नाणेकर, नामदेव गडदरे, शेख शिंदे, सुभाष आव्हाड, विकास कदम, गणेश हांडकर, श्रीकांत शेंडे, शिवा धांडे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव यांनी केली.

खूनाच्या प्रयत्नात फरार झालेल्या हल्लेखोराला अटक करण्यात आले आहे. त्याच्याविरूद्ध चंदननगर, कोरेगाव पार्क, विमानतळ पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. – राजेंद्र लांगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पोलिस ठाणे