
सामना ऑनलाईन । मुंबई
2007 चा वर्ल्डकप हिंदुस्थानी प्रेक्षकांसाठी तसा रटाळ ठऱला. कारण हिंदुस्थानने पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळल्याने प्रेक्षकांचा उत्साह कमी झाला. वेस्ट इंडीजमध्ये रंगलेल्या या वर्ल्डकपमधील दोन पराभव क्रिकेट इतिहासामध्ये कायमचे कोरले गेले. पहिला म्हणजे हिंदुस्थानला बांगलादेशकडून पराभव स्वीकारावा लागला आणि पाकिस्तानला आयर्लंडसारख्या संघाने पराभवाचे पाणी पाजत घरचा रस्ता दाखवला.
वर्ल्डकप इतिहासाची सफर – 2003 ला कांगारू सलग दुसऱ्यांदा विजेता
वर्ल्डकपमध्ये तब्बल 16 संघ सहभागी झाले होते आणि त्यांची चार गटांमध्ये विभागणी करण्यात आली होती. यापैकी गटातील प्रत्येक दोन संघ सुपर 8 मध्ये जाणार होते. हिंदुस्थान आणि पाकिस्तानने प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळला. चार गटातून ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडीज, बांगलादेश आणि आयर्लंडचे संघ सुपर 8 साठी पात्र ठरले होते. यापैकी श्रीलंका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ उपांत्यफेरीत पोहोचले.
वर्ल्डकपमधील प्रत्येक संघाविरुद्ध कसे आहे हिंदुस्थानचे प्रदर्शन? वाचा सविस्तर…
उपांत्यफेरीमध्ये पहिल्या लढतीत श्रीलंकेने न्यूझीलंडसमोर 289 धावा उभारल्या. श्रीलंकेच्या भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा डाव कोसळला आणि ते फक्त 208 धावांमध्ये गारद झाले. श्रीलंकेने 81 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या लढतीत दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलियाने 149 धावांमध्ये गुंडाळले. त्यानंतर हे लक्ष्य तीन गड्यांच्या मोबदल्यात पार करत 7 विकेटने विजय मिळवला आणि अंतिम फेरी गाठली.
1996 चा बदला घेतला
अंतिम लढतीमध्ये प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 4 हाद 281 धावा केल्या. त्यानंतर श्रीलंकेला 8 बाद 215 धावांमध्ये गारद करत ऑस्ट्रेलियाने 1996 मध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेतला आणि वर्ल्डकप विजयाची हॅटट्रिक साजरी केली.
ठळक वैशिष्ट्य –
– बांगलादेश आणि आयर्लंडचे धक्कादायक विजय
– ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप विजयाची हॅटट्रिक साजरी केली.
– मेग्राथने सर्वाधिक बळी घेत सामनावीरचा पुरस्कार मिळवला.
– मॅथ्यू हेडनने 659 धावा करत सचिननंतर (2003 मध्ये 673) सर्वाधिक धावांचा विक्रम केला.


























































