
सामना ऑनलाईन। सिडनी
-वर्षभरात 13 वनडेपैकी फक्त दोनच लढतीत विजय
-2015 च्या विश्वविजेतेपदानंतर ऑस्ट्रेलियन संघ अपयशाच्या गर्तेत
पाच वेळा आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या बलाढ्य ऑस्ट्रेलियन पुरुष संघाच्या यशाला गेल्या वर्षभरात उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. क्रिकेटमध्ये बलाढ्य गणला जाणाऱ्या कांगारूंना या वर्षभरात 13 वनडेपैकी फक्त 2 लढती जिंकता आल्या आहेत.कर्णधार स्टिव्हन स्मिथ आणि डेविड वॉर्नरच्या निलंबनामुळे एरव्ही ताकदवान वाटणारा ऑस्ट्रेलियन संघ आता पराभवाच्या आणि अपयशाच्या गर्तेत सापडलेला दिसत आहे. 2015 चे विश्वचषक जेतेपद पटकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाला आपल्या यशाचा आलेख चढता राखण्यात पार अपयश आल्याचे क्रिकेट शौकिनांना जाणवत आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने 1999 ते 2007 या कालावधीत तीनदा क्रिकेटचा विषवचशक जिंकला.या काळात त्यांनी त्यांनी सर्वाधिक 70 टक्के लढती जिंकण्यात यश मिळवले होते. 1987 ला कांगारू पहिल्यांदाच विश्वविजेते झाले. या विश्वविजेतेपदानंतर ऑस्ट्रेलियन संघाने पुढच्या स्पर्धेपर्यंत वनडे क्रिकेटवर आपले जबर वर्चस्व अबाधित ठेवले होते.या चार वर्षांत त्यांनी 91 वनडेपैकी 63 लढती जिंकून 69 टक्के यश मिळवले होते.
2015 नंतर अपयश मागे लागले
2015 च्या विश्वविजेतेपदानंतर ऑस्ट्रेलियन संघाच्या यशाचा आलेख सतत घसरत राहिला.त्यांनी या चार वर्षांत 63 लढती खेळून केवळ 28 लढतीच त्यांना जिंकता आल्या.त्यात तीन लढतींचा निकालचा लागला नाही. त्यामुळे कांगारूंना या काळात फक्त 46 टक्केच यश पदरात पडून घेता आले.2018 हे वर्ष तर या बलाढ्य संघासाठी अपयशी वर्षाचं ठरले असे म्हणावे लागेल.कारण त्यांनी 13 लढती खेळून फक्त 2 लढतीच जिंकल्या.इतकी त्यांची कामगिरी ढेपाळली.कदाचित स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नरसारख्या फलंदाजांच्या अनुपस्थिमुळे ऑस्ट्रेलियन संघाची बाजू लंगडी झाली असावी असे क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे.
1975 चा विश्वविजेता वेस्ट इंडिज संघ 1979 पर्यंत मजबूत होता.पहिल्या विजेतेपदानंतर विंडीजने 1979 पर्यंत 7 वनडे खेळून 5 लढती जिंकल्या.पण 1979 च्या विश्वविजेतेपदानंतर व्हीडीज पुढची 4 वर्षे 34 वनडे खेळून 23 सामने जिकू शकला.म्हणजेच त्यांच्या यशाचा आलेख 3 टक्कयांनी घसरला .
1983 ला कपिलदेवच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी संघाने प्रथमच क्रिकेट विश्वचषकावर देशाचे नाव कोरले .पण त्यानंतर 4 वर्षे मात्र 74 वनडेपैकी 32 लढतीच टीम इंडियाला जिंकता आल्या.5 लढती निर्णयावाचून संपल्या.म्हणजेच पहिल्या ऐतिहासिक विश्वविजेतेपदानंतर हिंदुस्थानच्या कामगिरीत यशाची टक्केवारी प्रचंड घसरली. 2011 ला हिंदुस्थानने महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली पुन्हा वनडे विश्वचषक जिंकला.पण त्यानंतरच्या विश्वचषकानंतर हिंदुस्थानी संघाला आपल्या यशाचा आलेख चढता राखता आलं नाही.त्यांनी 99 वनडे खेळून त्यातील 57 लढतीच जिंकल्या.म्हणजेच 58 टक्के यश मिळवले.आता पुन्हा हे दोन विश्वविजेते संघ एकमेकांसमोर उभे ठाकत आहेत. 2019 च्या विश्वचषकाच्या तोंडावर कोण झटपट क्रिकेटमध्ये यशाची बाजू मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



























































