‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..

हिंदुस्थानात आजच्या काळातही कार घेणे हे अनेकांच्या आवाक्या बाहेरच आहे. एवढेच नव्हे तर एका काळी देशातील नामांकित व्यक्तींकडेही कार नव्हती. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे काही फोटोंमध्ये कारमधून उतरताना किंवा चालताना दिसतात. मात्र या कार त्यांच्या नव्हत्या. महात्मा गांधी अनेकदा Packard 120 कारमधून प्रवास करत होते. असे बोलले जाते की, ही कार स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योजक घनश्याम दास बिर्ला यांची होती. त्याकाळात खूप कमी लोकांकडे कार होती. त्यापैकी एक दिल्ली क्लॉथ आणि जनरल मिल्सचे संस्थापक श्री राम हेही होते. त्यांच्याकडेही Packard 120 कार होती. हिंदुस्थानात सर्वात प्रथम कार ही जमशेदजी टाटा यांच्याकडे होती.

Packard 120 सेडानचे मागील दरवाजे पूर्वीसारखेच आजही पुढून उघडत नाही. कारच्या पुढील भागात इंजिन नव्हते. ज्यामुळे मागील चाकांकडे पॉवर ट्रान्सफर होत होती. Packard 120 कारचे मालक घनश्याम दास बिर्ला हे देशातील प्रसिद्ध बिर्ला समूहाचे संस्थापक होते. आज बिर्ला समूहाचा व्यवसाय हिंदुस्थानासह अनेक देशांमध्ये पसरलेला आहे. बिर्ला ग्रुप सिमेंट, अ‍ॅल्युमिनियम आणि टेलिकॉम क्षेत्रात कार्यरत आहे.

घनश्याम दास बिर्ला यांचा जन्म 10 एप्रिल 1894 रोजी राजस्थानच्या पिलानी येथे झाला होता. घनश्याम दास बिर्ला यांनी पहिल्या विश्वयुद्धात व्यावसायिक क्षेत्रात प्रवेश केला. बिर्ला हे महात्मा गांधींचे निकटवर्तीय मानले जात होते. बिर्ला यांनी 1918 मध्ये कोलकाता येथे जूट मिलची स्थापना करून पहिल्या विश्वयुद्धात हा व्यवसाय सुरू केला होता. त्यानंतर बिर्ला यांनी मुंबईमध्ये केशोरम कॉटन मिल सुरू केली. जी नंतर कोलकाता येथे हलविण्यात आली.

देशातील पहिल्या कार कंपनीची स्थापना

घनश्याम दास बिर्ला यांनी 1940 मध्ये ‘हिंदुस्तान मोटर्स’ची स्थापना केली. अशाप्रकारे त्यांनी वाहन बाजारातही प्रवेश केला. ही हिंस्थानातील पहिली कार कंपनी होती. हिंदुस्तान मोटर्सने पहिली स्वदेशी ‘अ‍ॅम्बेसेडर’ कारची निर्मिती केली होती. अनेक दशकांपासून ही कार हिंदुस्थानची शान मनाली जात होती. राजकारणी आणि नोकरशहांमध्ये ही कार खूप लोकप्रिय होती.

आपली प्रतिक्रिया द्या