वामन केंद्रे यांना एनएसडीचा ‘कारंथ’ राष्ट्रीय पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्ली (एनएसडी)वतीने दिला जाणारा नाटय़क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट योगदानासाठी देण्यात येणारा ब. व. कारंथ स्मृती राष्ट्रीय रंग पुरस्कार हा प्रा. वामन केंद्रे यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. एनएसडीच्या माजी विद्यार्थ्यांच्या सर्वोत्तम कामगिरीचा सन्मान व्हावा, या हेतूने एनएसडीचे माजी संचालक व हिंदुस्थानी रंगभूमीवरील कलावंत ब. व. कारंथ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या नावाने 2004 पासून पुरस्कार दिला जात आहे. यावर्षी हा सन्मान वामन केंद्रे यांना मिळाला आहे. केंद्रे यांना 2004 रोजीही हा पुरस्कार मिळालेला आहे. दोनवेळा पुरस्कार मिळवणारे एनएसडीच्या इतिहासातील पहिले कलावंत आहेत. केंद्रे यांच्या कार्यकाळातच गेल्या वर्षी थिएटर ऑलिंपिकचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.