बहुजन समाज मिलन आणि धम्म दीक्षा समारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

अखिल जैसवार विकास संघाच्या वतीने 19 फेब्रुवारी रोजी संत शिरोमणी गुरू रविदास यांचा जन्मदिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. जयंतीनिमित्त बहुजन समाज मिलन आणि बौद्ध धम्म दीक्षा समारंभ होणार आहे.

सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकासाठी भरीव कामगिरी करण्यासाठी अग्रेसर असलेल्या अखिल जैसवार विकास संघाच्या वतीने दरवर्षी संत शिरोमणी गुरू रविदास यांची जयंती साजरी केली जाते. जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यंदाही 19 फेब्रुवारी रोजी वांद्रे पूर्वेकडील गव्हर्न्मेंट कॉलनीतील 1 नंबर मैदानात गुरू रविदास यांचा जयंती सोहळा आयोजित केला असल्याची माहिती अखिल जैसवार विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष पैलास जैसवार यांनी सांगितले.