बाणकोटमधून 4 हापूस आंब्याच्या पेटया वाशी मार्केटला रवाना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाणकोट येथून 4 हापूस आंब्याच्या तयार पेटया वाशी मार्केटला विक्रीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. मंडणगड तालूक्यातील बाणकोट येथील आंबा बागायतदार फौजान शरीफ खिशे यांनी आपल्या बागेत पिकलेल्या हापूस आंब्याच्या प्रत्येकी 4 डझनच्या 4 पेटया नवी मुंबई येथील वाशी मार्केटला विक्रीसाठी सोमवारी पाठवल्या आहेत. मंडणगड तालूक्यातील फौजान खिशे हे वाशी मार्केटला हापूस पाठविणारे पहिलेच आंबा बागायतदार ठरले आहेत.

रत्नागिरी हापूस आंबा साधारणपणे गुढी पाडव्याच्या दरम्यान तयार होतो. मात्र, आंबा बागायतदार घेत असलेल्या मेहनतीमुळे सध्या हा विक्रम मोडीत निघत चालला असून मार्गशीर्ष महिन्यातच वाशी मार्केटला हापूस आंबा विक्रीसाठी पाठविण्याची काही आंबा बागायतदरांची चढाओढ सुरू आहे. यावर्षीच्या हापूस आंब्याचा हंगाम अजून लांबणीवर असला तरी मंडणगड तालूक्यातील बाणकोट येथील एक यशस्वी आंबा बागायतदार फौजान शरीफ खिशे या आंबा बागायतदाराने सोमवारी मंडणगड तालूक्यातून वाशी मार्केटला हापूस आंबा विक्रीसाठी पाठविण्याचा विक्रम केला आहे.

फौजान खिशे यांच्या बाणकोट येथील रहात्या घरामागेच आंब्याची बाग असून यातील दोन झाडांना आंबा लागला असून यातील तयार झालेल्या प्रत्येकी चार डझणाच्या चार पेटया खिशे यांनी वाशी मार्केटला विक्रीसाठी पाठविलेल्या आहेत. सेंद्रिय खतांच्या मात्रेने आणि नैसर्गिकरित्या तयार झालेल्या या हापूस आंब्याला वाशी मार्केटमध्ये किती भाव मिळतो याची उत्सुकता बाणकोटसह मंडणगडवासीयांना आहे.