बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या फ्लेक्सवर शाई फेकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा भावी खासदार म्हणून लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर शाई फेकल्याची घटना बारामती तालुक्यातील काऱहाटीपाटी नजीक रविवारी घडली. शाई फेकल्याचे लक्षात येताच पोलिसांच्यावतीने फ्लेक्स उतरवण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेला आपला उमेदवार उभा करणार असल्याचे जाहीर केले आहे. पवार यांनी उमेदवाराचे नाव जाहीर केले नसले तरी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच लोकसभेसाठी उमेदवार असणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे काऱहाटीपाटी येथे तो संबंधित फ्लेक्स लावण्यात आला होता. सुपे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, रविवारी बारामती दौऱयावर असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांना याबाबत विचारणा केली असता त्या म्हणाल्या, हा प्रकार चुकीचा आहे. हे कृत्य ज्याने कोणी केले असेल त्याची चौकशी झाली पाहिजे.