पीफमध्ये  ‘भोंगा’ वाजणार

2

सामना प्रतिनिधी । मुंबई

राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी आपल्या चित्रपटातून वास्तवाची जाणीव करून ठेवण्याची परंपरा कायम ठेवली आहे. असाच वेगळा विषय असलेल्या त्यांच्या ‘भोंगा’ या आगामी चित्रपटाची 17 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये निवड झाली आहे.

‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि ‘महाराष्ट्र शासन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 17 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा सात मराठी चित्रपट दाखवले जाणार आहेत, त्यात ‘भोंगा’ या चित्रपटाचा समावेश आहे. 10 ते 17 जानेवारीदरम्यान हा महोत्सव रंगणार आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘भोंगा’ची झालेली निवड ही निश्चितच आनंददायी असल्याचे दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी सांगितलं.

नलिनी प्रॉडक्शनस्ची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन तसेच कथा–पटकथा शिवाजी लोटन पाटील यांची आहे. चित्रपटाची  गीते सुबोध पवार यांनी लिहिली असून संगीतकार विजय गटलेवार यांनी ती संगीतबद्ध केली आहेत. शिवाजी लोटन पाटील व अरुण महाजन चित्रपटाचे निर्मात आहेत.