हिमंता बिस्वा सरमा यांच्याविराधात काँग्रेसचा मानहानीचा खटला

काँग्रेस आसामचे प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोरा यांनी स्थानिक न्यायालयात आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याविरोधात 10 कोटी रुपयांच्या मानहानीचा खटला दाखल केला आहे. सरमा यांनी केलेली वक्तव्ये भूपेन कुमार बोरा आणि काँग्रेसची प्रतिमा खराब करणारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री सरमा यांच्यासह स्थानिक वृत्तपत्राच्या संपादकांनाही प्रतिवादी बनवण्यात आले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष लवकरच पक्ष सोडणार असल्याचे आणि ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. सरमा यांनी अशी वक्तव्ये केली. त्यामुळे जनतेत बोरा यांची प्रतिमा खराब करण्याचे षड्यंत्र रचण्यात आल्याचा आरोप करणारे पत्र बोरा यांनी निवडणूक आयोगाला पाठवले आहे.

तृणमूलचा आचारसहिता भंगाचा आरोप

भाजपप्रणीत आसाम सरकारने निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. सरकारने पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची छायाचित्रे असल्याच्या जाहिराती प्रसिद्ध केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे.