भुसावळमध्ये 20 वर्षीय युवकाची हत्या ; शहरात खळबळ

1379
murder

भुसावळ येथील खडका रोड चौफुलीवर रविवार रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास 20 वर्षीय युवकाच्या छातीवर पोटावर अज्ञात व्यक्तीनी चाकूने वार करून हत्या केल्याची घटना येथे घडली.

खडका चौफुलीवर रविवारी दिनांक 13 रोजी रात्री 10 च्या सुमारास अल्तमश शेख रशीद (20) या युवकावर अज्ञात व्यक्तीनी चाकूने सपासप वार करून जखमी केले. दरम्यान जखमीस उपचारासाठी डॉ. मानवतकर दवाखान्यात आणले असता डॉक्टरांनी मृत झाल्याचे सांगितले. यावेळी डॉ. मानवतकर यांच्या दवाखान्यात नातेवाईक व मित्र मंडळींची गर्दी झाल्याने काही विपरीत घटना घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांनी आर.सी.पी.पथकांच्या कर्मचाऱ्यांना बोलावून दवाखाना परिसरात बंदोबस्त लावण्यात आला होता.

हा खून नेमका कुणी व कोणत्या उद्देशातून केला याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. खुनाची माहिती कळताच घटनास्थळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात रात्री उशिरा पर्यंत गुन्हा नोंद प्रक्रिया सुरु होती आरोपी फरार झाले असून पोलीस शोघ घेत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या