Big Boss 15 तेजस्वी प्रकाशने जिंकली बिग बॉस 15 ची ट्रॉफी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिग बॉसच्या 15 व्या सिझनचा फिनाले पार पडला असून अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने विजेतपद पटकावले आहे. प्रतीक सहजपाल आणि तेजस्वी प्रकाश हे दोघे अंतिम दोघांमध्ये होते. अखेर जास्त मतं मिळाल्याच्या आधारावर होस्ट सलमान खानने तेजस्वीला विजेती घोषित केले.

बिग बॉस 15 च्या फिनालेमध्ये रश्मी देसाई, करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी, प्रतीक सहजपाल, निशांत भट अंतिम सहामध्ये होते. त्यापैकी रश्मी देसाई सर्वात आधी घराबाहेर पडली. रश्मी बिग बॉसच्या 13 व्या सिझनमध्येही फिनालेमध्ये आली होती. तेव्हा ती टॉप चारमध्ये आली होती. त्यानंतर निशांत भट याने बिग बॉसने दहा लाखाची ऑफर स्वीकारत तो घरातून बाहेर पडला. त्यानंतर शमिता शेट्टी, प्रतीक सहजपाल, करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्यात ट्रॉफीसाठी चुरस होती.

त्यानंतर शमिता शेट्टी या स्पर्धेतून बाहेर पडली. त्यानंतर करण, तेजस्वी आणि प्रतीक हे तिघंही टॉप तीन स्पर्धक होते. पण, प्रेक्षकांची मतं कमी मिळाल्यामुळे करण कुंद्रा तिसऱ्या स्थानावर राहिला. अखेर तेजस्वी आणि प्रतीकमध्ये ट्रॉफीसाठी चुरस होती. प्रेक्षकांनी तेजस्वीला सगळ्यात जास्त मतं दिल्याने तेजस्वी प्रकाश बिग बॉसची विजेती ठरली.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)