चार राज्यात सहा बायका, 50 वर्षीय व्यक्तीचा असा झाला भांडाफोड

बिहारच्या 50 वर्षीय व्यक्तीचा प्रताप समोर आला आहे. या व्यक्तीने चार राज्यातील सहा महिलांसोबत लग्न करुन त्यांची फसवणूक केल्याची घटना बिहारमध्ये समोर आली आहे. देवघर, संग्रामपुर, सुंदरकुंड, दिल्ली, चिनवारिया आणि रांची येथे त्याने लग्न केले असून त्याला 6 बायका आहेत. त्याला मुलंही आहेत. मात्र एक दिवस असा भांडाफोड झाला.

बिहारमधील ही घटना आहे. छोटू कुमार असे या व्यक्तीचे नाव असून तो जावतरी गावातील रहिवासी आहे. गेल्या सोमवारी सहापैकी एक पत्नी मंजू हिच्या भावाने त्याला कोलकात्याच्या जमुई स्टेशनवर पाहिले. त्यावेळी त्या तो एका अन्य महिलेसोबत होता. विकासला आपल्या भावोजींचे वागणे संशयास्पद वाटले. त्यामुळे त्याने याबाबत आपल्या घरच्यांना कल्पना दिली.

मीडिया वृत्तानुसार, छोटूची सासु कोबिया देवी यांनी याबाबत पोलिसात तक्रार केली आणि सांगितले त्यांची मुलगी मंजूने 2018 साली छोटू नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केले होते आणि दोघांना दोन मुलं आहेत. पुढे त्यांनी सांगितले की, छोटूने दीड वर्ष औषधे घ्यावे लागण्याचे कारण सांगून घरातून बाहेर पडला होता. मात्र त्यानंतर तो परतलाच नाही. छोटूने आमची फसवणूक केली आहे. त्याचे लग्न रांची येथे राहणाऱ्या कलावतीसोबतही झाली आहे तिच्यापासून त्याला चार मुलं आहेत. छोटूने देवघर, संग्रामपुर, सुंदरकुंड, दिल्ली, चिनवारिया आणि रांची येथे लग्न केले असून त्याला 6 बायका आहेत.