भाजप नेत्याचा जवानावर गोळीबार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लष्करातील जवानावर किरकोळ वादातून भाजप नेत्याने गोळीबार केल्याची घटना घडली असून जखमी जवानाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.

अम्बाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिढेला गावातील अंशू तोमर जवान सुट्टीवर घरी आला होता. त्याचा आणि नगरपालिकेचा उपाध्यक्ष भाजप नेता नीतू तोमर याच्याशी किरकोळ वाद होता. या वादाचे पर्यावसान गोळीबारात झाले. तोमर आणि त्याच्या चार साथीदारांनी अंशूवर गोळीबार केला आणि ते फरार झाले. मिढेला रोडवर ही घटना घडली.

जखमी जवान अंशू याला नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र अधिक उपचारासाठी त्याला मुरैना येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आल्याचे वृत्त न्यूज 18 या वृत्तवाहिनीने दिले आहे.