
सामना ऑनलाईन । श्रीनगर
देशभरातील प्राथमिक मदरशांवर बंदी आणावी अशी मागणी करणाऱ्या शिया वक्फ बोर्डाचे वसीम रिझवी यांचे जम्मू कश्मीरचे भाजप नेते कविंदर गुप्ता यांनी समर्थन केले आहे. दहशतवाद रोखण्यासाठी मदरशांवर बंदी आवश्यक असल्याचे मत कविंदर गुप्ता यांनी व्यक्त केले आहे. कविंदर गुप्ता हे जम्मू-कश्मीर लोकसभा क्षेत्राचे खासदार असून त्यांनी मुख्यमंत्रीपदही भूषवले आहे.
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना गुप्ता म्हणाले की, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि अन्य काही देशांमध्ये संशयित कारस्थानांमुळे मदशांवर बंदी लगावण्यात आली आहे. याचप्रमाणे जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादावर नियंत्रण मिळवायचे असेल तर मदरशांवर बंदी आवश्यक आहे. तसेच जर जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी जमात-ए-इस्लामी ते समर्थन केले तर त्यांना अटक करायला हवी, असेही कविंदर गुप्त म्हणाले.
Kavinder Gupta, BJP: Bangladesh,Afghanistan & other nations banned madrasas because of illegal activities.Similarly if efforts to spread terrorism are made in Kashmir,they should be banned here too. If Mehbooba Ji supports Jamaat-e-Islami,then she too should be arrested. (6.3.19) pic.twitter.com/8NpCDpCi1D
— ANI (@ANI) March 7, 2019
याआधी शिया वक्फ बोर्डाचे रिझवी यांनी मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पत्र लिहून मदरशांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली होती. देशभरातील जिहादी मदरशांवर सरकारने तत्काळ बंदी घातली पाहिजे. या मदरशांमधून इसिसची विचारधारा मुलांपर्यंत पोहचवली जाते, असा गंभीर आरोप लगावत त्यांनी ही बंदीची कारवाई करण्याची मागणी केली होती.


























































