शुजात बुखारींसारखा तुमचाही ‘गेम’ करून टाकू , भाजप आमदाराची पत्रकारांना धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

पत्रकारांनो, स्वतःला वेळीच सुधारा. अन्यथा ‘रायजिंग कश्मीर’चे संपादक शुजात बुखारी यांच्यासारखा तुमचाही ‘गेम’ करून टाकू, अशी खुलेआम धमकी जम्मू-कश्मीरमधील भाजपचे आमदार चौधरी लालसिंग यांनी दिली आहे.

खटुआ बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चामध्ये आमदार चौधरी हे सहभागी झाले होते. नंतर त्या विरोधातील बातम्यांनंतर वातावरण तापल्यामुळे चौधरी यांना मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. तेव्हापासून ते पत्रकारांवर चिडलेले आहेत. आपलासुद्धा ‘शुजात बुखारी’ व्हावा असेच पत्रकारांना वाटते काय? त्यांनी वागायचे कसे, यासाठी स्वतःला ‘लक्ष्मणरेषा’ आखून घ्यावी, असे ते म्हणाले.