
शिवशाहू प्रतिष्ठान आणि बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ लोअर परळ विभागातर्फे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 1 डिसेंबर रोजी सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेत श्रमिक जिमखाना मैदान, ना. म. जोशी मार्ग, लोअर परळ येथे हे शिबीर होणार असून दोन हजार रक्त पिशव्या संकलन करण्याचा संकल्प आहे.
दसरा आणि दिवाळीनंतर रक्ताचा तुटवडा असतो आणि यामुळे अनेक गंभीर शस्त्रक्रिया रखडतात. एक रक्त पिशवी तीन जणांचे प्राण वाचवू शकते! ही काळाची गरज लक्षात घेऊन महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला चार भेटवस्तू देण्यात येणार आहेत. यंदाचे महारक्तदान शिबीर पद्मविभूषण रतन टाटा यांना समर्पित आहे. हा उपक्रम सामाजिक बांधीलकीचा आदर्श निर्माण करणारा ठरेल, असा विश्वास बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त जीवन भोसले यांनी व्यक्त केला. संपर्क – 9819591150.

























































