
जॉगिंग ट्रक, 488 खुल्या ठिकाणी व्यायामाची साधने, दर्जेदार पदपथ आणि योगा-ध्यानधारणा पेंद्र अशा सुविधांमुळे मुंबईतील मधुमेहग्रस्तांसाठी पालिकेची उद्याने खऱया अर्थाने ‘संजीवनी’ ठरत आहेत. मुंबईकरांना या सर्व सुविधा मोफत मिळत असल्याने मोठा फायदा होत आहे.
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा दूर ठेवण्यासाठी योग्य जीवनशैलीसह पुरेसा व्यायामही आवश्यक असतो. या पार्श्वभूमीवर 2021-2023 या कालावधीकरिता मधुमेहविषयक काळजी-खबरदारीसाठी आवश्यक सेवा उपलब्ध होणे ही संकल्पना जगभरात राबविण्यात येत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून मधुमेहासंदर्भात व्यापक जनजागृती करून मधुमेहग्रस्त रुग्णांना निरनिराळ्या वैद्यकीय सेवा दिल्या जातातच. यामध्ये उद्यान विभागदेखील यामध्ये महत्त्वाचे योगदान देत आहे. मुंबईसारख्या शहरात सर्वच नागरिकांचा जीवनक्रम अत्यंत धावपळीचा व दगदगीचा असतो. त्यातच महानगराच्या भौगोलिक मर्यादांमुळे प्रत्येकाला व्यायामाच्या सेवासुविधा पुरेशा मिळत नाहीत. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने उद्यान विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी सर्व परिसरांमध्ये उद्याने, खेळाची मैदाने, मनोरंजन मैदाने यांच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
अशा आहेत सुविधा
सद्यस्थितीत उद्यान विभागाच्या अखत्यारित एकूण 1 हजार 68 भूभाग आहेत. मागील चार ते पाच वर्षांपासून विविध उद्याने, मनोरंजन मैदाने आणि खेळांची मैदाने येथे खुली व्यायामाची उपकरणे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आजपर्यंत सुमारे 488 ठिकाणी अशी उपकरणे लावण्यात आली आहेत. त्यात आणखी वाढ करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि उपायुक्त (उद्याने) रमाकांत बिरादार यांनी दिले आहेत. यानुसार आवश्यक कार्यवाही सुरू असल्याची माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.



























































