
शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येणाऱया केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) संलग्न 11 शाळांच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या शाळांचा एकूण निकाल 92.89 टक्के इतका लागला असून चार शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. मिठागर सीबीएसई शाळेतील आर्या लामने ही विद्यार्थिनी 97.8 टक्के गुण मिळवून पहिली आली आहे.
पालिकेच्या शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येणाऱया केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ संलग्न 11 शाळांमधून एकूण 339 विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. यामधून पालिकेच्या भवानी शंकर रोड (दादर), राजावाडी (घाटकोपर), मिठा नगर (मुलुंड), पूनम नगर (अंधेरी) या शाळांचा 100 टक्के निकाल लागला आहे.



























































