
आखाती युद्धामुळे हिंदुस्थानच्या आयात निर्यातीचे गणित पूर्ण कोलमडले आहे. युद्धाचा थेट परिणाम हिंदुस्थानच्या निर्यातीवर झाला असून आखाती देशांत होणाऱया निर्यातीत मार्च महिन्यात तब्बल 58 टक्के घट झाल्याची माहिती वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिली.
मध्य पूर्वेत उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पश्चिम आशियाई क्षेत्रातील शिपमेंटवर गंभीर परिणाम झाला आहे. त्यामुळे मार्च महिन्यात पश्चिम आशियातील हिंदुस्थानच्या निर्यातीत 57.95 टक्के घट झाली आहे. केवळ निर्यातच नाही तर या देशांकडून होणाऱया आयातीतही 51.64 ची घसरण झाली आहे, अशी माहिती राजेश अग्रवाल यांनी दिली.
इराणने होर्मुझ मार्गावरून माल वाहतुकीवर निर्बंध घातल्यामुळे बहुतांश व्यापार ठप्प झाला आहे.
मार्च महिन्यात हिंदुस्थानची एपूण निर्यात 7.44 टक्क्यांनी घटून 38.92 अब्ज डॉलर इतकी राहिली असली तरी वार्षिक आकडेवारी काहीसा दिलासा देणारी आहे. 2025-26 या वर्षात वस्तूंची निर्यात 1 टक्क्याने वाढून 441.78 अब्ज डॉलर होईल असा अंदाज आहे. तसेच सेवा क्षेत्राची निर्यात 418. 31 राहण्याची शक्यता आहे. हिंदुस्थान 2025-26 मध्ये वस्तू आणि सेवांच्या निर्यातीत एपूण 4.22 टक्के वाढ नोंदवू शकतो. त्यामुळे एपूण आकडा 860 अब्ज डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे.


























































