
अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा संवाद सुरू होण्याच्या आशेने शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 1,264 अंकांच्या म्हणजेच 1.64 टक्के वाढीसह 78,111.24 अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 50 निर्देशांक 388.65 अंकांच्या (1.63 टक्के) वाढीसह 24,231.30 अंकांवर पोहोचला. या तेजीमुळे बीएसईवरील लिस्टेड पंपन्यांचं मार्पेट पॅप 9 लाख कोटी रुपयांनी वाढून 458 लाख कोटींवर पोहोचले. रुपयाच्या मूल्यात डॉलरच्या तुलनेत कोणताही मोठा बदल झाला नाही.
शेअर बाजारात आज आयटी, रिअॅल्टी, पंझ्युमर डय़ुरेबल्स, ऑईल अँड गॅस आणि केमिकल्स सेक्टर्सला आधार मिळाल्याने त्यात तेजी पाहायला मिळाली.
प्रमुख शेअर्स वधारले
सेन्सेक्समधील 30 पैकी 27 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. इंडिगो आणि इटर्नलच्या शेअर्समध्ये चार टक्क्यांहून अधिक वाढ झाली. तसंच पॉवरग्रिड, टीसीएस, टेक महिंद्रा आणि लार्सन अँड टुब्रोचे शेअर्स तीन टक्क्यांहून अधिक वधारले. एशियन पेंट्स, अदानी पोर्ट्स, सन फार्मा, कोटक महिंद्रा बँक, ट्रेंट आणि बजाज फिनसर्व्हमध्ये दोन टक्क्यांहून अधिक तेजी राहिली. दुसरीकडे, ऑक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि भारती एअरटेलमध्ये घसरण नोंदवण्यात आली.




























































