सीएसकेच्या विजयात ‘कॅप्टन कूल’ची कमाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महेंद्र सिंह धोनी सध्या दुखापतीमुळे आयपीएलच्या चालू हंगामात मैदानाबाहेर असला, तरी चेन्नई सुपर किंग्सच्या खेळावर त्याची छाप स्पष्टपणे उमटताना दिसतेय. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात हाच ‘धोनी टच’ अफगाण फिरकीपटू नूर अहमदच्या कामगिरीत दिसला. नूरने सीएसकेला विजय मिळवून दिला असला तरी ही कॅप्टन कुलची अदृश्य कमाल असल्याचे बोलले जात आहे. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या लढतीपूर्वी नूर अहमद अपेक्षित प्रभाव टाकू शकला नव्हता. चार सामन्यांत केवळ एकच विकेट घेतल्याने त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, नेटमध्ये सरावावेळी धोनीसोबत झालेल्या सखोल चर्चेनंतर त्याच्या गोलंदाजीत लक्षणीय बदल दिसून आला. या सामन्यात नूरने कमाल करत चार षटकांत अवघ्या 21 धावा देत तीन महत्त्वाचे विकेट टिपले.