
अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण प्रकरणात अमरावतीत संशयित अयाज अहमद याच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्यात आली. त्याच धर्तीवर, नाशिकचे नाव बदनाम करणाऱ्यांवर बुलडोझर कारवाई का नाही? असा सवाल भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी केला आहे.
नाशिकमध्ये घडलेल्या घटना गंभीर आहेत. बहुराष्ट्रीय पंपनीतील महिलांचे लैंगिक शोषण व धर्मांतर प्रकरणातील आरोपी, महिलांचे लैंगिक शोषण करणारा भोंदूबाबा अशोक खरात आणि कथित पत्रकार रवींद्र एरंडे यांच्या घरांवरदेखील बुलडोझर कारवाई करावी, अशी मागणी देवयानी फरांदे यांनी केली आहे.

























































