
हिंदुस्थानातील गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या डीआरडीओचे माजी शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज दणका दिला. आरोपी कुरुलकर यांना जामिनावर मुक्त केले तर ते साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याची शक्यता असून, ते संबंधित पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या संपर्कात असल्याने पळून जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांनी आरोपी कुरुलकरचा जामीन अर्ज आज फेटाळून लावला.



























































