वानखेडेंची बेकायदा कृत्ये लपवण्यासाठीच आपल्या विरोधात मानहानीचा दावा! मलिकांचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांची बेकायदा कृत्ये लपवण्यासाठीच आपल्या विरोधात समीर वानखेडे यांच्या वडीलांनी सव्वा कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी कोर्टात आपल्या विरोधात काही पुरावे सादर केले पण या पुराव्यात काहीच तथ्य नाही त्यामुळे वानखेडे यांचा मानहानीचा दावा फोल असून तो फेटाळण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. त्या संदर्भात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आज प्रतिज्ञापत्र सादर केले.

समीर वानखेडे यांच्या किरोधात दररोज नवाब मलिक नवनवीन आरोप करत आहेत. त्यामुळे आपल्या कुटुंबाची नाचक्की होत असल्याचा आरोप करत समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात मलिक यांच्या विरोधात 1.25 कोटींचा मानहानीचा दावा (सूट) दाखल केला आहे. सुटीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या समोर सोमकारी सुनाकणी घेण्यात आली. त्याकेळी न्यायालयाने नकाब मलिक यांना आज प्रतिज्ञापत्राकर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मलिक यांनी प्रतिज्ञापत्र सादर करीत आपल्याकरील सर्वक आरोप फेटाळले. आर्यनकडून खंडणी उकळण्यासाठी हा बनाव रचल्याचे आपण उघडकीस आणताच या बाबतचा तपास एनसीबीने वानखेडे यांच्याकडून काढून घेत दिल्लीच्या एसआयटीकडे वर्ग केला. तसेच वानखेडे यांचे जन्म प्रमाणपत्र खोटे असल्याचे एकही कागदपत्र सादर करता आले नाही. वानखेडे खोटे बोलत असून आपल्या विरुद्ध उच्च न्यायालयाने आदेश द्यावा यासाठी ते सूटद्वारे प्रयत्न करत आहेत, असे मलिक यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. याप्रकरणी उद्या बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे.

स्वतंत्र याचिका करायला हवी होती

समीर वानखेडे यांच्या व्यतिरिक्त त्यांची अभिनेत्री पत्नी क्रांती रेडकर, समीर यांची बहीण यास्मिन (वकील) यांची जर आपल्याकडून बदनामी झाली असेल तर त्यांनी  स्वतंत्र याचिका दाखल करायला हवी होती याशिवाय आपण केलेली विधाने ही अकमानकारक किंवा बदनामीकारक आहेत हे सिध्द करण्यास ज्ञानदेव वानखेडे अपयशी ठरल्याचेही मलिक यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.