बोरिवलीत पोलिसाला धक्काबुकी करून केली मारहाण 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाहतूक पोलीस शिपायाला धक्काबुकी करून मारहाण झाल्याची घटना बोरिवली येथे घडली आहे. मारहाण प्रकरणी एमएचबी पोलिसांनी दोन जणाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

दीपक कांबळे हे एमएचबी वाहतूक चौकीत कार्यरत आहेत. रविवारी दुपारी ते बोरिवली येथील डी मार्ट येथे डय़ुटीला होते. तेव्हा मोटरसायकलवरून दोन तरुण आले. त्यांनी हेल्मेट घातले नव्हते. त्यामुळे कांबळे याने त्यांचे पह्टो काढले. कारवाई सुरू असतानाच त्या दोघांनी कांबळेसोबत हुज्जत घातली. त्या दोघांनी कांबळेना मारहाण केली. तसेच पोलिसात खोटी तक्रार करण्याची धमकी दिली. धमकी दिल्यावर न थांबता त्या दोघांनी कांबळेच्या अंगावर गाडी नेण्याचा प्रयत्न केला. त्यात कांबळेच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पळून गेलेल्या त्या दोघांच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.