
मध्य प्रदेशमध्ये एक तरुण विवाहित महिलेला घेऊन पळून गेला. कुटुंबीयांना याबाबत कळाले असता त्यांनी तरुणाची यथेच्छ धुलाई केली.
मध्य प्रदेशच्या नोहटा जिल्ह्यात एक विवाहित महिला माहेरी आली होती. या महिलेला दोन मुलेही आहेत. गावातल्या एका तरुणाने या महिलेशी ओळख वाढवून प्रेमसंबंध निर्माण केले. नंतर दोघेही पळून गेले. ही बाब महिलेच्या कुटुंबीयांना कळताच त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी दोघांना शोधण्यास सुरूवात केली.
नंतर दोघेही जिल्हाधिकार्याच्या कार्यालयात असल्याची माहिती महिलेच्या कुटुंबीयांना मिळाली. त्यांनी लागलीच कार्यालयात धाव घेतली आणि तरुणाला बदड बदडले. त्यात महिलाही होत्या. त्यांनी तरुणाचे हातपाय बांधून मारहाण केली आणि आमच्या घरातील मुलीला फूस लावून पळून नेले असा आरोपही त्यांनी केला.
























































