
मुंबई शेअर बाजारात सोमवारच्या घसरणीनंतर मंगळवारी बाजारात काय घडणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे. मंगळवारी सकाळी बाजारात उत्साहात सुरुवात झाली आणि निर्देशांक वधारला. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही आणि 282 अंकांनी निर्देशांक खाली आला. त्यामुळे पुन्हा एकदा घरंगळ सुरू झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. पण काहीवेळात निर्देशांकाचा बाण हिरवं निशाण दाखवून 232 अंकांनी वधारला.
शेअर बाजारात सध्या 232 अंकांची वाढ दिसत असून निर्देशांक 49,437. वर पोहोचला आहे. तर निफ्टीमध्ये देखील 86.20 अंकाची भर पडली असून निर्देशांक 14,728.45 वर पोहोचला आहे.

































































