जालन्यातील काचनेरा येथे वीज पडून बैलाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होऊन रात्रीच्या सुमारास वादळ-वार्‍यासह काही प्रमाणात पाऊस पडत आहे.

याच दरम्यान आज सायंकाळच्या सुमारास जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील कचनेरा येथील शेत शिवारात एका बैलाच्या अंगावर वीज कोसळून बैल जागीच ठार झाला. त्यामुळे पशुपालकाचे मोठे नुकसान झाले आहे.

जाफराबाद तालुक्यासह परिसातील अनेक गावांमध्ये वादळी वारा, गारपीट, विजेच्या कडकडाटासह आवकाळी पावसाने हाहाकार घातला असून आज 20 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास काचनेरा येथील शिवारात गट क्र. 91 मध्ये शेतात लिंबाच्या झाडाखाली शेतकरी मनोहर दगदुबा जाधव यांची बैल जोडी बांधलेली होती. पाच वाजण्याच्या सुमारास वादळ-वार्‍यासह अवकाळी पावसासह वीज पडून एका बैलाचा मृत्यू झाला आहे.

यावर्षी शेतकर्‍यावर अनेक संकटांना शेतकरी सामोरे जात आहेत. यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. यावेळी पशु वैद्यकीय कर्मचारी डॉ. आर. एल. इंगळे, पुंजाराम डोईफोडे व महसूल कर्मचारी तलाठी उरफाटे यांना फोनवर माहिती कळविल्यानंतर लगेच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून अहवाल पुढील कार्यवाहीसाठी तहसील कार्यालय जाफराबाद यांच्याकडे देण्याचे आश्वासन दिले आहे.