
मध्य रेल्वेच्या बदलापूर ते वांगणी दरम्यान केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. केबल तुटल्याने कर्जत ते बदलापूर लोकल सेवा खोळंबली असून बदलापूर ते मुंबई लोकल सेवा उशिराने होत आहे. तसंच, मुंबईहून कर्जतच्या दिशेने येणाऱ्या लोकल ट्रेन बदलापूरपर्यंतच येत आहेत.

























































