पंढरपूर कॉरिडॉर रद्द करा; अन्यथा आषाढी एकादशीच्या पूजेला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वारंवार एकाच परिसरात विकासाच्या नावाखाली रुंदीकरणाचा घाट घातला जात असेल, तर तीर्थक्षेत्र पंढरपूरचा समावेश कर्नाटक राज्यात करावा, अशी संतप्त मागणी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील नागरिक व व्यापाऱयांनी केली आहे. पंढरपूर कॉरिडॉर रद्द न केल्यास येत्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेस कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणार असल्याचा इशारा पंढरपूरकरांनी दिला आहे.

पंढरपूर कॉरिडॉरबाबत चर्चा सुरू असताना प्रशासकीय पातळीवर मात्र याचे वेगाने काम सुरू असल्याने आमचा विश्वासघात केला जात असल्याचा आरोप करीत ‘तीर्थक्षेत्र पंढरपूर बचाव समिती’च्या वतीने आज पश्चिमद्वार येथे महिला व पुरुषांनी ठिय्या आंदोलन केले. आमच्यावर वारंवार अन्याय होत असेल, तर तीर्थक्षेत्र पंढरपूरचा समावेश कर्नाटक राज्यात केला जावा, अशी मागणी करू. शिवाय पुढील वर्षीच्या आषाढी एकादशीच्या पूजेला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्याचा इशारा देण्यात आला. तहसीदार सुशील बेल्हेकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन निवेदन स्वीकारले.