सुशांतसिंह राजपूत आत्महत्या तपासात सीबीआय घेणार अमेरिकेची मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात सीबीआय अमेरिकेची मदत घेणार असल्याचे वृत्त आहे. 14 जून 2020 रोजी सुशांतने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्या आत्महत्येसंदर्भात अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. तीन विविध तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सुशांतसिंह याचे सोशल मीडियावरील अकाऊंट आणि ई-मेलवरील डिलिट झालेली माहिती पुन्हा मिळवण्यासाठी सीबीआयने अलीकडेच अमेरिकेतील तपास यंत्रणांची भेट घेतली होती. कॅलिफोर्नियातील गुगल आणि फेसबुकच्या मुख्यालयांमध्ये सीबीआयचे अधिकारी गेले होते. परस्पर कायदेशीर सहकार्य करारांतर्गत संबंधित माहिती मिळावी यासाठी सीबीआयचे प्रयत्न सुरू आहेत. डिलिट झालेल्या माहितीमध्ये कदाचित सुशांतच्या आत्महत्येबाबत काही ना काही धागा मिळू शकतो, अशी माहिती एका सीबीआय अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.