मध्य रेल्वेचे मिशन गो ग्रीन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने आपल्या प्रवाशांसाठी पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्यासाठी अनोखे पाऊल उचलले असून फुलशेती आणि रेल्वे रुळांचे सुशोभीकरण यांचा मेळ घालण्याची अनोखी संकल्पना आणली आहे.

या संकल्पनेत रुळांची साफसफाई, रेल्वे रुळांवरील वनस्पती, कोरडे गवत आणि चिखल काढणे, माती आणि खताचे नूतनीकरण, नवीन रोपे लावणे आणि छाटणे, सध्याच्या वनस्पतींची छाटणी आणि पाणी देणे यांचा समावेश आहे. मेगाब्लॉकदरम्यान देखभाल-दुरुस्तीच्या कामांसह ही कामे एकाच वेळी केली जाणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत मार्च 2023 अखेर 50 हजार रोपे लावण्याची योजना आहे. मध्य रेल्वेच्या पर्यावरण आणि गृहव्यवस्थापन विभागाच्या ग्रीन इनिशिएटिव्हचा हा एक भाग आहे.