चंद्रपूरमध्ये भर जंगलात एक्सप्रेस बंद पडली, प्रवाशांना करावी लागली पायपीट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोंदियावरून येणारी गोंदिया- बल्लारपूर बेनार ट्रेन भर जंगलात बंद पडली. बराच काळ ट्रेन जागची हलत नसल्याने प्रवाशी वैतागले व अनेकांनी पायी जाण्याचा निर्णय घेतला. घटनास्थळावरून पुढी चांदा फोर्ट स्थानक चार किलोमीटर लांब होते. त्यामुळे ट्रेनमधून उतरलेल्या प्रवाशांना चार किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागली.