
महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या श्री संत परमहंस कोंडया महाराज यांच्या जन्म जयंती निमित्ताने होणारा यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या निर्बंधामुळे सलग दोन वर्ष यात्रा महोत्सव स्थगित होता. त्यामुळे यंदा भक्तांमध्ये उत्साह दिसून येत आहे. मोठ्या संख्येने भक्त संत नगरी धाबा येथे दाखल होत आहेत. सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवात धार्मिक कार्यक्रमाची मोठी रेलचेल बघायला मिळणार आहे.
या महोत्सवाचे आकर्षक असलेल्या अग्निकुंड प्रभावळीच्या कार्यक्रम बघायला लाखोंची गर्दी उसळत असते.तीन राज्यातून मोठ्या संख्येने भक्त महोत्सवाला हजेरी लावणार असल्याने भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी कोंडय्या महाराज देवस्थान संस्थानने पूर्ण तयारी केली आहे. यात्रेत कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलीस विभागही सज्ज आहे. सात दिवस चालणाऱ्या या यात्रा महोत्सवात लाखोंची उलाढाल होत असते. विविध भागातून लघु व्यावसायिक इथ येऊन दुकाने थाटतात. तेलंगणा – महाराष्ट्राला जोडणारा शिरपूर- गोंडपिपरी मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळ भक्तांच्या प्रवास त्रासदायक ठरणार आहे.



























































