चंद्रपूर – वाघाच्या हल्लात शेतकरी ठार, मूल तालुक्यातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतातील उभ्या असलेल्या धान पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना मूल तालुक्यताील चिरोली येथे मंगळवारी सकाळी घडली. येवनाथ विकरूजी चुनारकर (वय – 75) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नांव आहे.

चिरोली येथील येवनाथ चूनारकर हे नेहमीप्रमाणे शेतातील धानपिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. दरम्यान दबा धरून असलेल्या वाघाने त्यांच्यावर झडप घेऊन त्यांना जागीच ठार केले. घटनेची माहिती मिळताच विभागीच वनाधिकारी प्रशांत खाडे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला.

वनविभागाने वाघाच्या हल्लात ठार झालेल्या कुटुंबियांना तात्काळ 30 हजार रूपयाची आर्थिक मदत केली आणि मृतदेह उत्तरीय तपासणी करीता मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.