
सुदृढ आरोग्याचा संदेश देणाऱ्या चंद्रपुरच्या मेडिकल कॉलेज परिसरातच मोठी अस्वच्छता पसरली आहे. कुठे कुत्रे, कुठे गाढव तर कुठे म्हैस फिरत असल्याचे धक्कादायक चित्र आज मेडिकल कॉलेज मध्ये दिसत आहे.
आरोग्य बिघडलं की उपचारासाठी रुग्ण इथचं येतात. इथं पसरलेल्या अस्वच्छतेमुळ रुग्णांचं आणि रुग्णांच्या सोबतीला आलेल्या नातेवाईकांचं आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग तर अस्ताव्यस्त वाहने असल्याने मेडिकल कॉलेज मधील सुरक्षा गार्ड, स्वच्छता विभाग नेमकं काय काम करत असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.





























































