Video – चंद्रपुरात शेतातल्या विहिरीत पडला पट्टेरी वाघ, बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात मोखाडा येथील शेतशिवारात असलेल्या विहिरीत पट्टेरी वाघ पडल्याची घटना सकाळी उघडकीस आली. रात्रीच्या सुमारास हा वाघ विहिरीत पडला असल्याची शक्यता असून, सकाळी ही घटना शेतमालकास लक्षात आली.

वाघाचे गुरगुरणे ऐकल्यावर त्याने जाऊन बघितले असता वाघ विहिरीत पडल्याचे त्याच्या निदर्शनास आले. लागलीच त्याने वन विभागाला माहिती दिली आणि सकाळपासून या वाघाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पाहा व्हिडीओ –