श्री सिद्धेश्वर तलावातील पाण्यावर केमिकलसदृश थर दिसून येत असून, तलावातील मासे जगण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. तलावातील पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
तलावातील पाण्यावर दिसणारा हा थर नेमका कशामुळे निर्माण झाला, याची तपासणी करून पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणे गरजेचे आहे. जलप्रदूषणामुळे जलचरांच्या जीविताला धोका निर्माण होत असेल, तर ही बाब पर्यावरणाच्या दृष्टीने चिंताजनक आहे. ‘सिद्धेश्वर तलावातील पाण्यावर केमिकलचा थर दिसतोय, तर दुसरीकडे मासे जगण्यासाठी धडपडत आहेत. निसर्गाचा हा आक्रोश केळीच ओळखा’, अशा शब्दांत महाराष्ट्र नकनिर्माण किद्यार्थी सेनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे यांनी या परिस्थितीकडे लक्ष वेधले.
सिद्धेश्वर तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करावी, पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करावी आणि प्रदूषणास कारणीभूत घटक आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी अभिषेक रंपुरे यांनी केली आहे.



























































