हायजॅक अलर्टनंतर एअर इंडिया विमानाचे जयपूरमध्ये आपत्कालीन लँडिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हायजॅक अलर्टनंतर फ्रँकफर्टहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे जयपूरमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमान जयपूर विमानतळावर सुरक्षित उतरतल्यानंतर सुरक्षा तपासणीसाठी हलवण्यात आले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते.

मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, एअर इंडियाचे विमान बुधवारी जर्मनीतील फ्रँकफर्टहून दिल्लीला चालले होते. यादरम्यान अपहरण झाल्याचे सूचित करण्यासाठी वापरला जाणारा ‘स्क्वॉक 7500’ हा आंतरराष्ट्रीय कोड अहमदाबाद हवाई वाहतूक नियंत्रण (ATC) विभागाला मिळाला. सतर्कतेचा इशारा मिळाल्यानंतर विमानाचे जयपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.