
बांगलादेशचे माजी हंगामी प्रमुख मोहम्मद युनूस यांना अमेरिकेतील न्यूयॉर्पच्या जेएफके विमानतळावर तीव्र जनक्षोभ व संतापाचा सामना करावा लागला. मुख्य सल्लागार पद सोडल्यानंतरच्या पहिल्याच परदेश दौऱयावर गेलेल्या युनूस यांना विमानतळावर उपस्थित बांगलादेशी नागरिकांनी घेराव घालत जोरदार जोरदार घोषणाबाजी केली. तुम्ही दहशतवादी असून शेकडो लोकांचे मारेकरी असल्याचा गंभीर आरोप यावेळी बांगलादेशी नागरिकांनी केला.
न्यूयॉर्प विमानतळामधून बाहेर पडत असताना अमेरिकेत राहणाऱया काही बांगलादेशी नागरिकांनी त्यांना घेरले. यादरम्यान संतप्त नागरिकांनी युनूस यांना ‘तुम्ही दहशतवादी आहात. तुम्ही बांगलादेशात शेकडो निष्पापांचा आणि लोकांचा बळी घेतला आहे. देशात हिंसाचार घडवून आता येथे कशासाठी आला आहात? त्वरित परत जा!’ अशा शब्दांत सुनावत तीव्र रोष व्यक्त केला. दरम्यान, परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करत त्यांना गर्दीतून सुरक्षितपणे बाहेर काढले.
युनूस यांच्या काळात हिंदुस्थान आणि बांगलादेशातील राजनैतिक संबंध कमालीचे ताणले गेले. मार्च 2025 मध्ये चीन दौऱयादरम्यान त्यांनी हिंदुस्थानच्या ईशान्येकडील राज्यांबद्दल (नॉर्थ-ईस्ट) केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये मोठी कटुता निर्माण झाली होती.
विजयादशमी दसऱया दिवशी रावण दहन करण्यासाठी सध्या रावणाचे पुतळे बनवण्याचे काम मुंबईत अनेक ठिकाणी वेगाने सुरू आहे. दसऱयाला अवघा आठवडा राहिल्यामुळे कारागिरांकडून पुतळ्यांना अंतिम स्वरूप देण्याची लगबग दिसून येत आहे.



























































