सात आधुनिक आश्चर्यांपैकी एक असणारी चीनची भिंत कोसळतेय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बीजिंग

जगातील सात आश्चर्यांपैकी एक असणारी चीनची भिंत कोसळू लागली आहे. 6450 किलोमीटर लांबीच्या या भिंतीचा 30 टक्के भाग तुफान पाऊस आणि वादळामुळे कोसळला आहे, अशी माहिती नॅशनल जिओग्राफिकने दिली आहे. हा ऐतिहासित ठेवा जपण्यासाठी आणि भिंतीच्या तुटलेल्या भागांपर्यंत पोहोचण्यासठी चीन सध्या ड्रोनची मदत घेत आहे.

ड्रोनद्वारे चीन अॅथॉरिटीने तुटलेल्या भिंतीचा एक नकाशा तयार केला आहे. याची एकत्रीत माहिती संग्रही करून ती भिंत वाचवणाऱ्या मजुरांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. या भिंतीला वाचवण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या मजुरांना याचा फायदा होणार असून त्यांना तिथपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. सध्या हजारो मजूर ही भिंत वाचवण्यासाठी झटत आहेत.

चीनच्या हेब प्रांतामध्ये असणाऱ्या भिंतीची निर्मिती 1368 ते 1644 या दरम्यान करण्यात आली होती. ही भिंत कोरियन सीमेपासून गोबी डेझर्टपर्यंत पसरलेली आहे. शांशी प्रातांतील दाई काउंटीमध्ये यानमेनजवळ या भिंतीचा काही भाग यापूर्वी पडला होता. प्रचंड पावसाच्या तडाख्याने भिंत पडल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते.