चिनी ड्रॅगनला कोरोनाचा पुन्हा विळखा; ‘आयफोन सिटी’त लॉक डाऊन, शहरात एका दिवसात 32,695 नवीन प्रकरणे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनमध्ये कोविड19 रुग्णांची संख्या पुन्हा मोठ्याप्रमाणात वाढत आहे आणि शहरात कोरोना उद्रेक नियंत्रित करण्यासाठी कठोर उपाय आणि प्रतिबंध लागू केले आहेत. चीनमध्ये गुरुवारी 32,695 नवीन स्थानिक प्रकरणे नोंदवली गेली, त्यापैकी 3,041 लक्षणे असलेले आणि 29,654 लक्षणे नसलेले होते. एका दिवसापूर्वी ही संख्या 31,444 होती.

चेंगडू, जिनान, लॅन्झू, शियान आणि वुहान सारख्या शहरांमध्ये दररोज शेकडो नवीन संक्रमण नोंदवले गेले. तर ग्वांगझू आणि नैऋत्य चोंगकिंगमध्ये कोविड संसर्गाची मोठ्या प्रमाणात नोंद झाली आहे.

ऍपलच्या सर्वात मोठ्या आयफोन उत्पादन साइटचे घर असलेल्या झेंगझोऊमध्ये 6.6 दशलक्ष लोकांना पुढील चार दिवस घरी राहण्यास सांगितले आहे. असोसिएटेड प्रेसने वृत्त दिले आहे की, सरकारने विषाणूविरूद्धचे अंतिम युद्ध म्हटले आहे. त्यामध्ये दैनिक चाचणीचे आदेश देण्यात आले आहेत.

पाच ठळक मुद्दे

  1. गेल्या 24 तासांत कोविडच्या नवीन रुग्णांची संख्या 31,444 ने वाढली आहे. 2019 च्या उत्तरार्धात मध्य चिनी शहर वुहानमध्ये पहिल्यांदा कोरोनाव्हायरस आढळून आल्यापासून ही सर्वाधिक दैनंदिन आकडेवारी आहे. जरी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण आणि मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी, चीनचे सरकार ‘झिरो-कोविड’ धोरणासाठी वचनबद्ध आहे जे प्रत्येक केस वेगळे करण्याचा आणि व्हायरस पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे.
  2. परंतु कारखाने बंद न ठेवता सरकार नव्या उद्रेकावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. 2020 च्या सुरुवातीला जसे कारखाने बंद ठेवले होते तसे यंदा करण्यात आलेले नाही. यामुळे फॉक्सकॉनच्या झेंगझोऊ येथील उत्पादन कारखान्यात आंदोलन सुकू आहे. जिथे 20,000 हून अधिक कामगार कठोर कोविड निर्बंधांमुळे पळून गेले आहेत, असे रॉयटर्सने म्हटले आहे.
  3. व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या आयफोन फॅक्टरीमध्ये कठोर उपायांविरोधात कामगार निषेध करत आहेत. या आठवड्यात कारखान्यातील कामगारांची पोलिसांशी झटापटही झाली.
  4. कंपनी सोडून गेलेल्या कामगारांच्या जागी भरती झालेल्या कामगारांच्या देयकावर झालेल्या मतभेदांमुळे मंगळवार आणि बुधवारी निदर्शने झाली.
  5. बीजिंगमध्ये गुरुवारी 424 लक्षणे नसलेली आणि 1,436 लक्षणे नसलेली प्रकरणे नोंदवली गेली, तर चोंगक्विंगमध्ये 258 नवीन प्रकरणे आढळली. 6,242 लक्षणे नसलेली प्रकरणे नोंदवली गेली.