नगर महापालिकेच्या आयुक्तांचे दालन पोलिसांनी घेतलं ताब्यात? कुछ तो गडबड है…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभा निवडणुकीमुळे राज्यात नगरची चांगलीच चर्चा राहिली. आता पुन्हा एकदा नगर चर्चेत येत आहे. मात्र कारण थोडं वेगळं आहे. आज नगर महानगरपालिकेचे आयुक्तांचे दालन पोलिसांनी अचानकपणे ताब्यात घेतलं आहे. नेमकं दालन कशासाठी ताब्यात घेतले याची माहिती अजून कळलेली नाही. याविषयी कुणी वरिष्ठ काही सांगायला तयार नाहीत पण आज अचानक दुपारच्या वेळेला पोलीस या ठिकाणी आले व त्यांनी महानगरपालिकेतील असलेले आयुक्तांचे दालन ताब्यात घेतलं आहे.