लाखो लोकांना क्लाऊड कॉम्प्युटिंगचे प्रशिक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात सध्या क्लाऊड कॉम्प्युटिंगची मागणी वाढत असून त्यासाठी प्रशिक्षित डिजिटल कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. एका अहवालानुसार, 2025 पर्यंत हिंदुस्थानातील 63 टक्के कर्मचाऱ्यांना त्यांच्या करीअरमध्ये प्रगती करण्यासाठी क्लाऊड संबंधित कौशल्यांचे प्रशिक्षण आवश्यक वाटते. एडब्ल्यूएसने 2017 पासून देशातील 20 लाखांहून अधिक लोकांना क्लाऊड कौशल्याचे प्रशिक्षण दिले असून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. दरम्यान, नवीन लोकांपासून ते अनुभवी आयटी व्यावसायिकांपर्यंत नवीन क्लाऊड कॉम्प्युटिंग कौशल्ये शिकवण्यासाठी व्यावसायिक आणि सरकार यांच्याशी आम्ही नेहमीच सहकार्य करत असतो, असे एडब्ल्यूएसच्या एशिया पॅसिफिक आणि जपान कमर्शियल सेल्सचे व्यवस्थापकीय संचालक फिल डेव्हिस यांनी सांगितले.