‘त्यांची’ स्क्रीप्ट बारामतीतून लिहून येते – मुख्यमंत्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

‘त्यांच्या’ भाषणाची स्क्रीप्ट सध्या बारामतीतून लिहून येते आणि त्या स्क्रीप्टवर ते अभिनय करतात अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नामोल्लेख न करता समाचार घेतला. राजकीय फायद्यासाठी पुलवामा हल्ला घडवला गेला आणि तसाच आणखी एक हल्ला घडवला जाऊ शकतो असा दावा राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापनदिनी केला होता.

केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या उपस्थितीत भाजपचा महिला मेळावा आज झाला. त्यात मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख ‘गल्लीतील कलाकार’ असा केला. बारामतीकरांना जे बोलता येत नाही ते अशा कलाकारांकडून ते बोलवून घेतात असे मुख्यमंत्री म्हणाले. राज ठाकरे यांनी भाजपवर आरोप करताना प्रेझेन्टेशनच्या माध्यमातून पुरावेही सादर केले होते.