भयंकर… 10 वर्षांच्या बहिणीवर भावाचा बलात्कार; मुलीने दिला बाळाला जन्म

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बोगोटा ( कोलंबिया)

कोलंबियामध्ये एका 10 वर्षांच्या मुलीने एका बालकाला जन्म दिला आहे. या घटनेने जगभरात खळबळ उडाली आहे. या मुलीवर तिचा मोठा भाऊ लैंगिक अत्याचार करत होता. त्यामुळे गर्भवती राहिलेल्या त्या मुलीने बालकाला जन्म दिला आहे. मुलीच्या आईवडिलांनी मुलाविरोधात तक्रार दाखल करण्यास नकार दिल्याने त्याला अटक करण्यात आलेली नाही. तसेच त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मुलगी आणि तिचे बाळ रुग्णालयात असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

कोलंबियातील प्योर्टो लैग्यूजेमो भागात ही मुलगी कुटुंबासोबत राहत होती. गेल्या काही वर्षांपासून तिचा भाऊ तिचे लैंगिक शोषण करत होता. त्याने तिच्यावर बलात्कारबी केला होता. त्यामुळे गर्भवती राहिलेल्या या मुलीने एका मुलाला जन्म दिला आहे. एवढ्या कमी वयात झालेल्या बलात्कारामुळे आई बनल्याच्या या घटनेमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. मात्र, मुलीच्या आईवडिलांनी मुलावर गुन्हा दाखल करण्यास नकार दिला आहे. तसेच त्याच्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. या घटनेवर मुलीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच बलात्कार करणाऱ्या भावाचे वयही समजलेले नाही. मात्र, या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत असून तिच्या भावावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.